Posts

LATEST BLOGS

गणपतीगडद: कातळात कोरलेलं प्राचीन लेणंसंकुल

Image
गणपतीगडद: कातळात कोरलेलं प्राचीन लेणंसंकुल ऑगस्टचा पहिला आठवडा... आणि गणपतीगडदच्या मोहिमेवर निघायचा बेत अखेर ठरला! पण हा योग जुळून यायला वर्षानुवर्षांचा काळ जावा लागला होता. दरवेळी काही ना काही विघ्न यायचं आणि ठरवलेला बेत आयत्या वेळी उधळून लावायचा. नशिबाचा हा खेळ इतका अजब होता की, दर खेपेला कुठली तरी नवीच अडचण समोर ठाकायची. याही वेळी तीच पुनरावृत्ती झाली. दोन-दोन आठवडे पूर्ण तयारी करून बॅग पॅक करून ठेवली, आणि बरोबर निघण्याच्याच क्षणी रवी अचानक आजारी पडला! तोवर झालेला सगळा उत्साह क्षणात मातीमोला झाला आणि पुन्हा एकदा मोहिमेवर विरजण पडलं. पण या शनिवारी आम्ही निश्चय पक्का केला—काहीही होवो, या रविवारी गणपतीगडद गाठायचाच! लतेश तात्काळ तयार झाला, आणि आम्ही ट्रेकची अंतिम आखणी करून ग्रुपवर मेसेज टाकला. तितक्यात एक अनपेक्षित वळण आलं—रवीचा मेसेज धडकला, "मी येतोय!" खरं तर मला कसलीच अपेक्षा नव्हती. लागोपाठ दर रविवारी त्याचे बाहेर दौरे चालू असल्याने त्याला या प्रवासाची साथ देणं जमेल की नाही, याबद्दल मनात शंका होती. पण त्याचा हा मेसेज म्हणजे आमच्यासाठी जणू पर्वणीच ठरली! रवीच्या य...

अलिबागातील कुलाबा किल्ला भटकंती अनुभव

Image
समुद्रात कुलाबा किल्ला आणि सर्जेकोट      करमकर शिल्प संग्रहालयातील शिल्प वैभव पाहून भटकंतीच्या निमित्ताने येथे आल्याचे सार्थक झाले असे वाटले. कनकेश्वर मंदिरात भारतीय मध्ययुगीन काळातील कारागिरांचे शिल्प वैभव पाहिले आणि त्याच परिसरात आधुनिक भारतातील शिल्पकारांनी पाश्चात्य शैलीत घडवलेली शिल्पे पाहण्याचा योग या भटकंतीत आला. सर्व शिल्प वैभव डोळ्यांत साठवून आम्ही अलिबागच्या दिशेने कुलाबा किल्ला पाहण्यासाठी निघालो. दुपारचे २ वाजले होते. ओहोटीची वेळ ४ ची होती आणि अलिबाग १८ किलोमीटर दूर होते. अलिबागला पोहोचून जेवण करून किल्ल्यावर जायला आमच्या हातात फक्त दोन तास होते. आमची चौकडी सासवणे गावावरून अलिबागच्या दिशेने निघाली.       अलिबागमधील एका हॉटेलमध्ये पोटपूजेसाठी थांबलो. जेवण संपेपर्यंत पावणे चार वाजले होते. हॉटेलपासून अलिबाग चौपाटी फक्त ९०० मीटरवर होती. चार वाजता चौपाटीवर पोहोचून गाडी पार्किंगमध्ये लावून आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो. अलिबाग चौपाटीवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होती. पश्चिम दिशेला समुद्रात कुलाबा किल्ला आणि सर्जेकोट ही दुर्गद्वयी दर्...

करमरकर शिल्प संग्रहालय

Image
    कनकेश्वर मंदिरातील नितांत शांतता, कला, स्थापत्य आणि भक्ती यांचा संगम अनुभवून आम्ही पुढील प्रवासासाठी करमरकर शिल्प संग्रहालयाकडे निघालो.      कनकेश्वर मंदिरापासून हे शिल्प संग्रहालय सुमारे १२ किमी अंतरावर आहे. अलिबाग रोडवर येऊन रेवसच्या दिशेने सुमारे ७ किमी प्रवास केल्यानंतर डाव्या बाजूने जाणाऱ्या आवास रस्त्याने पुढे गेल्यावर आवास फाट्यावरून ससावणे गावात पोहोचता येते. याच ससावणे गावात, प्रसिद्ध शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर (नानासाहेब करमरकर) यांच्या जन्मगावी, त्यांच्या स्वतःच्या घरात हे शिल्प संग्रहालय उभारण्यात आले आहे. येथे सुमारे १५० हून अधिक शिल्पकृती प्रदर्शित आहेत.      करमरकर शिल्प संग्रहालय अलिबागपासून सुमारे १८ किमी, रेवस जेट्टीपासून १२ किमी आणि मांडवा जेट्टीपासून अवघ्या साडेचार किलोमीटर अंतरावर आहे. ससावणे गावात पोहोचताच ‘करमरकर शिल्प संग्रहालय’ अशी पाटी दिसते. तिच्या जवळच कौलारू छपराचे, दुमजली बंगलोवजा घर नजरेस पडते. घराच्या कंपाउंडमध्ये प्रवेश करताच बागेत मांडलेले शिल्पवैभव आपले लक्ष वेधून घेते.      प्...