मुंबईतील वाघशीळा -वाघोबा देव
मुंबईतील वाघशीळा- वाघोबा देव आधुनिक मुंबई शहरामध्ये अनेक प्राचीन ऐतिहासिक स्थळांचा आणि पुरातन ठेव्यांचा खजिना आहे. अंधेरीतील महाकाली गुंफा, जोगेश्वरीतील जोगेश्वरी गुंफा, आणि बोरिवलीमधील कान्हेरी, मागाठाणे, व मंडपेश्वर लेणी या ठिकाणांमध्ये ऐतिहासिक वारसाचे दर्शन घडते. तसेच बोरिवलीमधील एक्सर मध्ये काही वीरगळ सापडलेले आहेत त्या वीरगळांचा संदर्भ १२६५ शतका मध्ये यादव राजा महादेव आणि शिलाहार राजा सोमेश्वर यांच्यात झालेल्या लढाईशी मिळतो, ती लढाई मुंबईच्या इतिहासा मधिल एक महत्त्वपूर्ण घटना आहे.बोरिवली पूर्व मधील देवीपाडा येथे एक विरगळ गावदेवीचा स्वरूपात मंदिरात पुजला जातोय मुंबईमध्ये अजूनही अनेक अशा प्राचीन ठेव्यांचे अस्तित्व असू शकते, जे अजून प्रकाशझोतात आलेले नाहीत. त्यापैकी एक उल्लेखनीय ठिकाण म्हणजे गोरेगाव चित्रनगरीजवळील हाबले पाड्यातील वाघोबा मंदिरातील वाघशिळा. हा ठेवा आदिवासी संस्कृतीशी संबंधित असून, वाघशिळा म्हणजे वाघोबा देवता, जी आदिवासी निसर्ग पूजकांची देवता आहे. हबाले पाड्यातील वाघोबा मंदिरातील वाघशिळा अकराव्याव्या-बाराव्याव्या शतकातील असल्याचा अंदाज आहे , ज्यातून मुंबईच्या प्राची